शाबुदाणा वडा रेसिपी

शाबुदाणा वडा रेसिपी

साबुदाणा वडा . जबरदस्त असा हा नाश्ता चा प्रकार आहे जवळपास सगळ्यांना आवडणारा असा हा पदार्थ आहे. त्यात आज एकादशीचा दिवस साबुदाणा वडा बनवला आपल्याकडे सगळेजण हे बोलत असतात घरात एकाची एकादशी असते एकाची एकादशी म्हणजे पूर्ण घराची एकादशी असते म्हणजे जो पण पदार्थ बनेल उपवासाचा साबुदाणा खिचडी असो काही ही असो ते पूर्ण घरातले मेंबर खाणार. म्हणजे एकाच्या मागे पूर्ण घराची एकादशी तीही फक्त उपवासाचे पदार्थ खाण्यासाठी, त्यात अजून एक म्हण ची भर घातलेली आहे आपण 'एकादशी दुप्पट खाशी' फराळाच्या पदार्थांचा असच होते खूप चविष्ट आणि छान लागतात आपल्याकडे बऱ्याच छोट्या मोठ्या हॉटेल कॅन्टीनमध्ये साबुदाणा वडा आपल्याला नासत्यात मिळतोच साबुदाणा खिचडी पेक्षाही चविष्ट लागतो,मग तो हेल्थ साठी चांगला आहे किंवा नाही त्याचा विचार येत नाही
मग अशा वेळेस आप्पेपात्रात वडाच्या जागेवर आपे ही बनवू शकतो कमी तेलात आप्पे तयार होतात. माझ्या पॉटलक पार्टीत मी बऱ्याच दा साबुदाणा वडा बनवून नेला आहे सगळ्यांना माझ्या हातचा वडा आवडतो आवर्जून मीच करून आणावा असा हट्ट असतो मैत्रिणींचा तो हट्ट पूर्ण करावा लागला. तर नक्की करून बघा साबुदाणा वडा रेसिपी.
Ingridiants


साहित्य:

  • २ कप शाबुदाणा (साबुदाणा)
  • १/२ कप शेंगदाणे (भाजून कुटलेले)
  • २ बटाटे (उकडलेले व कुस्करलेले)
  • १ चमचा जीरं
  • २-३ हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या)
  • १ चमचा लिंबाचा रस
  • मीठ चवीनुसार
  • तेल (तळण्यासाठी)
  • १ चमचा साखर
  • कोथिंबीर (सजावटीसाठी)

 
कृती:

  1. शाबुदाणा धुऊन ४-५ तास भिजत ठेवा. नंतर त्यातील पाणी काढून टाका.
  2. एका मोठ्या बाऊलमध्ये शाबुदाणा, कुस्करलेले बटाटे, कुटलेले शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, जीरं, लिंबाचा रस, साखर आणि मीठ घाला.
  3. सर्व साहित्य चांगले मिक्स करा. मिश्रण एकत्र येईपर्यंत चांगले मळून घ्या.
  4. एका पॅनला थोडे तेल लावून मिश्रण पॅनमध्ये घालून लहान लहान गोलाकार वड्या बनवा.
  5. एक पॅन गरम करून त्यात तेल घाला. तेल गरम झाल्यावर तयार केलेल्या वड्या तळा.
  6. वड्या दोन्ही बाजूंनी सोनेरी रंगाच्या आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.
  7. तळलेल्या वड्या किचन पेपरवर ठेवा ज्यामुळे अतिरिक्त तेल निघून जाईल.
  8. शाबुदाणा वडी गरमागरम, हिरव्या चटणी किंवा दही सोबत सर्व्ह करा.
  9. वरून कोथिंबीर घालून सजवा.
  10. टीप:

    • शाबुदाणा योग्यप्रकारे भिजवला असल्याची खात्री करा. जर तो पुरेसा भिजला नसेल तर वडी चांगली बनेल नाही.
    • वड्या तळताना मध्यम आचेवर तळा, ज्यामुळे त्या आतपर्यंत शिजतील आणि बाहेरून कुरकुरीत होतील.
    ready vada




टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

Butter Chicken Recipe

Pav Bhaji Recipe